Udemybeginneren

सौर ऊर्जा तंत्रज्ञान व व्यवसाय : पूर्ण प्रॅक्टिकल मार्गदर्शन

Learn to start a solar panel, heater, and street light agency. Get comprehensive training and business skills.

5.0(1)
3students
7h 35m
Certificate
Kiran Ramkrishna Beldar
Kiran Ramkrishna BeldarProfessor at Mumbai University, India

Course Content

सौर ऊर्जा तंत्रज्ञान व व्यवसाय : पूर्ण प्रॅक्टिकल मार्गदर्शन is a beginner-level Udemy course taught by Kiran Ramkrishna Beldar. It runs 7h 35m, is taught in English, and includes a certificate of completion. Learners rate it 5.0 out of 5 from 1 review, with 3 students enrolled. It is a paid course, last updated September 2025.

आजच्या काळात सौर ऊर्जा (Solar Energy) सर्वात स्वच्छ, नवीकरणीय आणि वेगाने वाढणारी ऊर्जा आहे. भारतात, विशेषतः महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जेची मागणी झपाट्याने वाढत आहे. या संपूर्ण कोर्समध्ये, तुम्ही सोलर पॅनेल, सोलर वॉटर हीटर, सोलर स्ट्रीट लाईट, तसेच ऑन-ग्रिड/ऑफ-ग्रिड सिस्टीम आणि सौर ऊर्जा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रिया प्रत्यक्ष उदाहरणांसह शिकणार आहात.

हा कोर्स केवळ तांत्रिक ज्ञान देत नाही, तर तुम्हाला प्रॅक्टिकल इन्स्टॉलेशन, O&M (Operation & Maintenance), साइट व्हॅल्यूएशन आणि सरकारी मंजुरी प्रक्रिया याबद्दलही सविस्तर मार्गदर्शन करतो.

या कोर्समध्ये तुम्ही काय शिकाल?

  • सोलर पीव्ही सिस्टीम:
    • सोलर सेल आणि पॅनेलचे प्रकार
    • सिरीज व पॅरलल कनेक्शन
    • मल्टिपल स्ट्रिंग्स
    • MC4 कनेक्टर व वायरिंग तंत्र
    • ऑन-ग्रिड, ऑफ-ग्रिड आणि हायब्रिड रूफटॉप सिस्टीम
    • इन्व्हर्टर, DCDB, ACDB, बॅटरी, चार्ज कंट्रोलर, केबल मॅनेजमेंट
    • माउंटिंग स्ट्रक्चर, अर्थिंग व लाइटनिंग प्रोटेक्शन
    • इन्स्टॉलेशनसाठी लागणारी साधने, साइट व्हॅल्यूएशन, चाचण्या व देखभाल
  • सोलर वॉटर हीटर:
    • फ्लॅट प्लेट कलेक्टर, इव्हॅक्युएटेड ट्यूब, हीट पाइप ETC कलेक्टर
    • पाणी टाकी, माउंटिंग स्ट्रक्चर, इनलेट-आउटलेट कनेक्शन
    • प्लंबिंग कनेक्शन (स्वयंचलित, मालिका, हीट पाईप)
    • ऑपरेशनल पॅरामीटर्स व साइट आवश्यकता
  • सोलर स्ट्रीट लाईट्स:
    • नियमित, इंटिग्रेटेड व ऑल-इन-वन मॉडेल्स
    • पोल डिझाईन, बॅटरी, चार्ज कंट्रोलर, सोलर पॅनेल
    • ब्लॉक डायग्राम, वैशिष्ट्ये व डिझाईन पद्धती
  • सौर व्यवसाय मार्गदर्शन:
    • महाराष्ट्रामध्ये नवीन सोलर एजन्सी कशी सुरू करावी
    • मंजुरी व लोड सॅंक्षन प्रक्रिया
    • नेट मीटरिंग, लायसॉइनिंग व अनुदान/विनाअनुदान प्रकल्प प्रक्रिया
    • प्रकल्पासाठी कोटेशन व प्रस्ताव तयार करण्याची पद्धत
    • व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्यक्ष टिप्स

हा कोर्स कोणासाठी आहे?

  • अभियांत्रिकी व डिप्लोमा विद्यार्थी
  • इलेक्ट्रिकल/मेकेनिकल टेक्निशियन
  • सोलर व्यवसाय सुरू करू इच्छिणारे उद्योजक
  • इन्स्टॉलेशन व O&M मध्ये करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी
  • नूतनीकरणक्षम ऊर्जेमध्ये करिअर घडवू इच्छिणारे सर्वजण

या कोर्सची वैशिष्ट्ये:

  • सोप्या भाषेत समजावलेले व्हिडिओ लेक्चर्स
  • प्रत्यक्ष उदाहरणे, वायरिंग डायग्राम्स व चेकलिस्ट
  • व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक सरकारी प्रक्रिया स्पष्ट केलेल्या
  • प्रॅक्टिकल नॉलेज + थिअरी यांचा उत्कृष्ट संगम
  • विद्यार्थ्यांना करिअर किंवा व्यवसायात थेट मदत होईल असे मार्गदर्शन

हा कोर्स पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान, इन्स्टॉलेशन कौशल्ये आणि व्यवसाय सुरू करण्याची आत्मविश्वासपूर्ण तयारी मिळेल. आता वेळ आहे ग्रीन एनर्जी क्रांतीत सामील होण्याची!

$ whoami — the devs behind tutorialsearch.io

Hire the developers behind TutorialSearch.io

We built this site — full-stack web apps, AI integration & automation. Tell us what you need and we'll build yours.

5.0
2h 22m
intermediate
pluralsight
5.0
1h 3m
beginner
pluralsight
5.0
2h 46m
beginner
pluralsight
5.0
5h 16m
intermediate
pluralsight